14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने मोडला 17 वर्षांचा विश्वविक्रम! शुबमन गिललाही टाकलं मागे
14 वर्षांच्या स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) अंडर-19 आशिया कप 2025 (Asia Cup 2025) च्या पहिल्याच सामन्यात धमाका केला. यूएईविरुद्धच्या सामन्यात, वैभवने शानदार फलंदाजी करत 171 धावांची जबरदस्त खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 14 गगनचुंबी षटकार मारले. वैभवने फक्त 56 चेंडूंमध्ये आपले दमदार शतक पूर्ण केले, पण तो द्विशतक करण्यापासून थोडक्यात हुकला.
या शानदार खेळीमुळे वैभव सूर्यवंशीने नवा इतिहास रचला आणि एक 17 वर्षांचा जुना विश्वविक्रम मोडला. तो युथ वनडे सामन्यांच्या एका डावात सर्वाधिक षटकार (14 षटकार) मारणारा फलंदाज ठरला आहे. या खेळीदरम्यान त्याने 95 चेंडूंमध्ये 171 धावा केल्या.
या खेळीमुळे वैभव सूर्यवंशी आता अंडर-19 वनडे स्पर्धेत भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या कामगिरीमध्ये त्याने भारतीय कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलचा (Shubman gill) (160 धावा, 2017 मध्ये) विक्रम मोडला. त्याने गिलसोबतच मयंक अग्रवाल (160) आणि राज बावा (162*) सारख्या खेळाडूंनाही मागे टाकले आहे.
सध्या, भारतासाठी U19 वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठा वैयक्तिक धावसंख्या करण्याचा विक्रम अंबाती रायुडूच्या (177 धावा, 2002 मध्ये)* नावावर आहे. वैभव हा विक्रम मोडण्यापासून फक्त एका षटकाराने म्हणजेच 6 धावांनी दूर राहिला.
Comments are closed.