पाकिस्तानची चाल फसली! हेग न्यायालयाचा निर्णय भारताने फेटाळला
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. भारताने हा करार स्थगित केल्यानंतर मोठा गदारोळ झाला होता. या करारावरील बंदी उठवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. त्यांनी जागतिक न्यायालयातही धाव घेतली आहे.
सिंधू जल कराराबाबत हेगस्थित 'स्थायी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन'चा निर्णय भारताने फेटाळला आहे. लवादाच्या न्यायालयाचा निर्णय भारताने आधीच बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. पाकिस्तानने नेदरलँडच्या न्यायालयात भारताविरोधात तक्रार दाखल केली. भारताने स्पष्टपणे सांगितले की, आम्हाला न्यायालयाचा अधिकार मान्य नाही. हा निर्णय केवळ कागदाचा तुकडा असल्याचेही भारताने म्हटले आहे.
अनेक प्रयत्न करूनही पाकिस्तानला यश मिळत नाही. पाकिस्तान भारतावर दबाव आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. मात्र, पाकिस्तानला काहीच मिळत नाही.
हेही वाचा-
- अनेक महिने समुद्रात घालवल्यानंतर आता विश्रांतीची वेळ आली आहे
Comments are closed.