विजय मल्ल्याचं ट्विट झालं झुरळ

भारत सोडून परदेशात लपलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने झुरळ जनता पक्षाबाबत पोस्ट टाकली आहे. मलाही झुरळ बनायचे आहे, असे मल्ल्याने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विशेषतः, त्याला झुरळ का व्हायचे आहे? याचे कारणही मल्ल्याने दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीजेपीची जगभरात जोरदार चर्चा होत आहे. आता विजय मल्ल्याच्या ट्विटमुळे सीजेपी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

विजय मल्ल्या यांनी X वर एक पोस्ट शेअर केली आहे. माझ्यावर होत असलेला आणि अजूनही होत असलेला अन्याय पाहून मीही झुरळ व्हावे असे वाटते. झुरळांचे आयुष्य चांगले असू शकते, असे मल्ल्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मल्ल्या यांनी व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केले असून आपल्याला अन्यायकारक वागणूक दिल्याचे म्हटले आहे.

मल्ल्या ईडीबद्दल काय म्हणाले?

मल्ल्या यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी ईडीवर भाष्य केले आहे. देशातील सर्वात धोकादायक एजन्सी, ईडीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे आणि कबूल केले आहे की मी 2021 मध्ये बँकांना 14,000 कोटी रुपये दिले आहेत. जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर मी जे बोलतो ते बोलणे थांबवा. पण ईडी काय म्हणाले ते ऐका; असे मल्ल्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, किंगफिशर एअरलाइन्सचे विजय मल्ल्या, फायरस्टार इंटरनॅशनलचे नीरव मोदी आणि स्टर्लिंग बायोटेक तसेच स्टर्लिंग सेझचे नितीन संदेसरा यांच्यासह १५ जणांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. या 15 जणांवर गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत विविध बँकांची 57,000 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या टॉप 15 गुन्हेगारांच्या यादीत आणखी काही लोकांचा समावेश आहे. यामध्ये झिलॉग सिस्टीमचे सुदर्शन वेंकटरामन आणि रामानुजम शेषार्थिनम, स्टर्लिंग बायोटेकचे नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि पुष्पेश कुमार बैद आणि इतरांचा समावेश आहे.

हेही वाचा-

Comments are closed.