आयआयटी दिल्ली आणि एसीएसआयआर यांच्यात संशोधनाच्या देवाणघेवाणीचे नवीन मार्ग उघडले!

उद्योगाशी घट्ट संबंध असलेल्या अशा संशोधन विषयांवर काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल, असे ते म्हणाले. करारावर स्वाक्षरी करताना दोन्ही संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये संचालक, डीन, असिस्टंट डीन आणि विभागप्रमुखांचा समावेश होता.

यावेळी दोन्ही संस्थांनी त्यांच्या शैक्षणिक व संशोधन कार्यासंबंधी सादरीकरणेही दिली. या करारामुळे दोन्ही संस्थांच्या संशोधन क्षमतेची सांगड घातली जाईल तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रयोगशाळा, तज्ञ आणि संशोधन वातावरणात काम करण्याची संधी मिळेल. यामुळे संस्थात्मक सीमांच्या पलीकडे जाऊन संयुक्त संशोधनाच्या शक्यताही वाढतील.

Comments are closed.