17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर मिळणार मोठी भेट 'ही' मागणी पूर्ण होणार आहे

DA Hike News : महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेले राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतन धारक महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकारने 55% वरून 58% केला आहे आणि हा निर्णय 1 जुलै 2025 पासून लागू आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांच्या या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येत आहे.

याशिवाय विविध राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही सरकारकडून वाढ करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांचा महागाई भत्ताही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या स्तरावर ५८ टक्के करण्यात आला असून यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय २० ऑक्टोबर रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत जारी करण्यात आला आहे.

या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना ५८ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होणार आहे.

अर्थात या संबंधित अधिकाऱ्यांनाही महागाई भत्त्याची फरकाची रक्कम दिली जाणार आहे. दिवाळीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या स्तरावर अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्के करण्यात आल्याने या निर्णयाचा संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता कधी मिळणार?

दिवाळीपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेत कार्यरत 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणे अपेक्षित होते.

पण आजही सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता केवळ 55% आहे. पण दिवाळीनंतर राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यातही वाढ होणार आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता म्हणजेच ५८ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असून ही वेतनवाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात अधिकृत शासन निर्णय निघण्याची शक्यता असून सरकारी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याच्या थकबाकीचा लाभ दिला जाणार आहे.

Comments are closed.