Video – हेडफोनने केला घात, भांडूपमध्ये विजेचा शॉक लागून 17 वर्षीय मुलाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. भांडूपमध्ये ही घटना घडली असून हेडफोनमुळे या तरुणाचा घात झाला आगे.

मिळालेल्या माहितीनुसार दीपक पिल्ले हा भांडूपच्या एलबीएस मार्गावरील पन्नालाल कंपाऊंड परिसरातून जात होता. त्याने कानात हेडफान घातले होते आणि गाणी ऐकत जात होता. या मार्गावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. तो जिथून जात होता तिथे विजेच्या उघड्या तारा होत्या. लोकांनी त्याला आवाज दिला आणि तिथून जाऊ नको असे सांगत होते. पण दीपकला हा आवाज ऐकूच आला नाही कारण त्याने हेडफोन घातले होते. तारेचा स्पर्श होताच दीपक खाली पडला आणि विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दीपकचा मृत्यू नेमका कसा झाला हे व्हिडीओतून दिसतं. या भागातील रहिवाशांनी यापूर्वीच इतरांना त्या तारेपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता, कारण तो आधीपासूनच धोकादायक ठरत होता. त्यांच्या सतर्कतेमुळे याआधी अनेकांना अपघात होण्यापासून वाचवता आले होते.

Comments are closed.