वडीलांचा आईला फोन; रक्ताच्या उलट्या झाल्याची माहिती, घरी येऊन पाहिलं तर 12वीमध्ये शिकणाऱ्या तरू
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील मुरमी येथे १८ वर्षीय तरुणीची अज्ञाताने घरात गळा चिरून हत्या (Chhatrapati Sambhajinagar Crime News) केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना काल (शुक्रवारी, ता १९) दुपारी उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ, असे मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेने गंगापूर हादरून गेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही वाळूज येथील साईनाथ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिकत होती.(Chhatrapati Sambhajinagar Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता ती घरी आली. वैष्णवीचे वडील संतोष यादवराव नीळ हे दहेगाव-बिडकीन मार्गावर असलेली पानटपरी चालविण्यासाठी गेले होते, तर आई मथुरा शेतात कामाला गेलेली होती. वैष्णवीचा भाऊ प्रीतेष हा सकाळी शाळेत गेलेला होता. दरम्यान, महाविद्यालयातून आलेली वैष्णवी घरात एकटीच होती. दुपारी संतोष नीळ यांनी पत्नी मथुरा यांना फोन करून वैष्णवीला रक्ताच्या उलट्या होत असल्याचे सांगितले. तेव्हा मथुरा व इतर नातेवाइकांनी घरी धाव घेतली. तेव्हा त्यांना वैष्णवी खाटेजवळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली आढळली. तिला तत्काळ बाहेर ओसरीत आणले असता ती मयत झालेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून वैष्णवीचा मृतदेह रुग्णालयात हलविला. याप्रकरणी वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञातावर गुन्हा दाखल केला.
Chhatrapati Sambhajinagar Crime News: फॉरेन्सिक पथक घटनास्थळी
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, वाळूज पोलिसांनी घटनास्थळी श्वान व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले होते. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची माहिती घेतली, आई-वडील घरी नसताना तिच्यासोबत नेमकं काय घडलं, याचा तपास पोलिस करत आहेत. गंगापूर तालुक्यातील मुरमी येथील ही घटना आहे. ही धक्कादायक घटना काल उघडकीस आली. वैष्णवी संतोष नीळ (१८), असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वैष्णवी वाळूज येथील एका विद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होती. शुक्रवारी तिचे आई-वडील कामासाठी बाहेर गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास वैष्णवीचा मृतदेह घरात आढळून आल्याने ग्रामस्थांना धक्का बसला.
घटनेवेळी ती घरात एकटीच होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची धाव, फॉरेन्सिक टीम पाचारण घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर, वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.