नागपूरच्या दारूगोळा निर्मिती कारखान्यात स्फोट; 18 ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नागपूर जिह्यातील एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारूगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या डिटोनेटर पॅकिंग युनिटमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत 18 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून 17 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 15 महिला आहेत. जखमींना नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश देत मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली.

स्फोट झाल्यानंतर कारखान्यात मोठी आग लागली. त्याशिवाय पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेचे (पेसो) पथकही पोहोचले. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आगली. एसबीएल ही औद्योगिक स्फोटके बनवणारी कंपनी आहे. खाणकाम आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी लागणारी स्फोटके, डिटोनेटर्स आणि संबंधित उत्पादने तयार करते.

कंपनीचे म्हणणे काय?

स्फोटावर एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. सध्या जखमी कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता हेच सर्वोच्च प्राधान्य असून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा तत्काळ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. स्फोटानंतर सुरू असलेल्या अधिकृत तपासात कंपनी पूर्ण सहकार्य करत आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

…तर घटना टळली असती – अनिल देशमुख

बाजारगाव परिसरातील सर्वच स्पह्टके कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री, ‘पेसो’ व संबंधित विभागाकडे पत्र लिहून मागणी केली होती, परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने परत आज एक मोठी दुर्घटना घडली. वेळीच जर सुरक्षा ऑडिट केले असते तर आजची घटना टाळता आली असती, असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे, ‘पेसो’ या संस्थेचे मुख्यालय नागपुरातच आहे, तरीही नागपूरमध्ये स्फोटांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत ही गंभीर बाब असल्याचेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

g काटोल तालुक्यात राऊळगाव येथे एसबीएल कंपनीचा बारूद आणि डेटोनेटर तयार करण्याचा कारखाना आहे. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात भीषण स्पह्ट झाला. घटना घडली त्यावेळी कारखान्यात 30 पेक्षा जास्त कामगार काम करीत होते. त्यात बहुतांश महिलांचा समावेश होता. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, कारखाना जमीनदोस्त झाला. अनेक कामगारांच्या मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला.

Comments are closed.