19 year old boy attacks 36 year old women after Attack after refusing physical sambhajinagar crime
छत्रपती संभाजीनगर : येथे एक अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. ‘एक तर तू माझ्याबरोबर झोप, नाही तर तुझ्या जावेशी माझे जुळवून दे…’ भावकीतील एका 19 वर्षीय मुलाने 36 वर्षीय महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. नकार दिल्यानंतर नराधमाने महिलेवर अंगभर कटरने वार केले. यात महिलेला 280 टाके घालावे लागले. सव्वादोन फुटांचा एक वार मानेपासून मांडीच्या खालपर्यंत आहे.
पीडिता अल्पभूधारक शेतकरी असून मजुरी करतात. त्यांना 11 वर्षांची दोन जुळी मुले आहेत. मरणयातनांपेक्षा भयंकर वेदना सहन करीत ही महिला एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
हेही वाचा : कार्यकर्त्याकडून अर्धनग्न करून एकास बॅटने बेदम मारहाण, सुरेश धस म्हणाले, ‘दीड वर्षांपूर्वी…’
अभिषेक तात्याराव नवपुते ( 19, रा. घारदोन ) असे आरोपी नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या तोंडावर घटनेचा लवलेशही नव्हता. न्यायालयाने नराधमाला तीन दिवसांनी पोलीस कोठडी सुनावली आहे.
पीडिता अल्पभूधारक शेतकरी असून मजुरी करतात. सासरप्रमाणेच त्यांच्या माहेरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. पीडितेवर उपचार करण्यासाठी आता जो खर्च येईल त्यासाठी त्यांकडे पुरेसे पैसेही नाहीत. बँकेकडे आपले राहते घर गहाण ठेवून कर्ज घेण्याची प्रक्रिया पीडितेच्या दोन भावांनी सुरू केली आहे.
महिलेला भयावह स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त रक्तस्राव झालेला असल्याने आतापर्यंत त्यांना 5 बाटल्या रक्त देण्यात आले आहे.
हेही वाचा : काकांशी वाद झाल्याने घराबाहेर पडली अन्…; मुंबईतील 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
Comments are closed.