कारखान्याला लागलेल्या आगीत २ ठार
पिथमपूर : मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यातील पिथमपूर औद्योगिक क्षेत्रात बुधवारी रात्री उशिरा आगीची भीषण घटना घडली. शिवम इंडस्ट्रीज नावाच्या ल्युब्रिकेंट ऑइल कारखान्याच्या परिसरात अचानक एका टँकरमध्ये आग लागली, यामुळे दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर होरपळले आहेत. संबंधित टँकरमध्ये ल्युब्रिकेंट ऑइल भरलेले होते, यात अज्ञात कारणांमुळे आग लागल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले आहे. या आगीच्या तडाख्यात सापडल्याने 23 वर्षीय नीरज आणि 35 वर्षीय कल्पेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर टँकरचालक मनोज झा आणि अग्निशमन कर्मचारी दिलीप सिंह यादव गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु गंभीर स्थिती पाहता इंदोरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Comments are closed.