छत्तीसगडमध्ये 2 नन्सने सशर्त जामीन मंजूर केला
बिलासपूर :
छत्तीसगडच्या दुर्ग येथे मानवतस्करी आणि धर्मांतराच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नन्सना शनिवारी दिलासा मिळाला आहे. बिलासपूर एनआयए न्यायालयाने दोन्ही नन्सना जामीन मंजूर केला आहे. 25 जुलै रोजी दुर्ग येथे दोन्ही नन्सना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या वतीने जामीन याचिका दाखल करण्यात आली होत. यानंतर याप्रकरणी बिलासपूर येथील एनआयए न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही नन्सना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 25 जुलै रोजी आगरा येथून आलेल्या रेल्वेत दोन्ही नन्सना नारायणपूर येथील 3 महिलांसोबत पकडण्यात आले होते. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवर रेल्वे पोलिसांनी नन प्रीति मेरी आणि वंदना फ्रान्सिस यांच्यासोबत सुकमन मंडावी नावाच्या इसमाला अटक केली होती. या तिघांवर बळजबरीने धर्मांतर आणि मानवतस्करीचा आरोप करण्यात आला होता.
Comments are closed.