दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल 2 शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे
मंडळ/श्रीनगर
दहशतवादी संघटनांशी संबंध बाळगल्याप्रकरणी दोन शिक्षकांना बडतर्फ करण्याचा आदेश जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी जारी केला. बडतर्फ करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे गुलाम हुसैन आणि माजिद इक्बाल डार अशी आहेत. गुलाम हुसैन हा रियासी जिल्ह्यातील कलवा मुलास भागाचा रहिवासी आहे. तर माजिद इक्बाल डार हा राजौरी जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोन्ही शिक्षकांच्या कारवाया सेवेतून बडतर्फ करण्यायोग्य असल्याचे आदेशात म्हटले गेले आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षेच्या हिताकरता अनुच्छेद 311 (2)(क) अंतर्गत याप्रकरणांमध्ये कुठल्याही प्रकारच्या औपचारिक विभागीय चौकशीची आवश्यकता नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मागील काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाने अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना याच तरतुदीच्या अंतर्गत सेवेतून बडतर्फ पेले आहे. प्रशासकीय स्तरावर हा निर्णय एक विस्तृत सुरक्षा मूल्यांकनानंतर घेण्यात आला आहे. ज्यात गुप्तचर यंत्रणांच्या अहवालाला आधार करण्यात आले आहे.
 
			 
											
Comments are closed.