छत्तीसगडमध्ये आणखी २१ नक्षलवाद्यांनी आश्रय घेतला आहे
शस्त्रs सोडून शांततेच्या मार्गाला पसंती
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडमधील कांकेर जिह्यातील अंतागढ विकास ब्लॉक क्षेत्रातील आणखी 21 नक्षलवाद्यांनी रविवारी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. ताडोकी पोलीस ठाण्यापासून 8 किलोमीटर नैर्त्रुत्येस असलेल्या बारबेडा गावात या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यात आले. गेल्या पंधरवड्यापासून ‘पुना मार्गेम: पुनर्वसन ते पुनरुज्जीवन’ उपक्रमांतर्गत सुरक्षा दलांना रविवारी हे आणखी एक यश मिळाले. अलीकडेच राज्यात तब्बल 210 नक्षलवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पण केले होते.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये 13 महिला आणि 8 पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे या सर्वांनी सशस्त्र आणि हिंसक विचारसरणीचा त्याग करून शांतीचा मार्ग निवडला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री विजय शर्मा यांनी याची पुष्टी केली. आत्मसमर्पण करणाऱ्या 21 नक्षलवाद्यांनी आपल्याकडील 3 एके-47, 2 आयएनएसएएस रायफल, 4 एसएलआर, 3 एन-36, 2 सिंगल-शॉट रायफल आणि एक बीजीएल लाँचर आदी शस्त्रे पोलीस स्थानकात जमा केली आहेत. हे सर्व नक्षलवादी केशकल विभागाच्या (उत्तर उप-क्षेत्रीय ब्युरो) कुएमारी/किस्कोडो क्षेत्र समितीचे असून यात विभाग समिती सचिव मुकेश याचा समावेश आहे.
Comments are closed.