22 thousand hectares of area damaged due to unseasonal rains in marathi


Unseasonal Rain : मुंबई : राज्यात सुरू असलेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा 21 जिल्ह्यातील तब्बल 22 हजार 233 हेक्टरवरील पिकाला फटका बसला आहे. शेतात उभ्या असेलल्या पिकाचे अनोतान नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. साधारणपणे 1 मेपासून सुरु झालेला अवकाळी पाऊस, वादळीवारे आणि गारपीटीमुळे केळी, आंबा, मका, संत्रा, धान, भाजीपाला, फळपीकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या पंचनामे सुरु आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात आकडा वाढण्याची शक्यता आहे. (22 thousand hectares of area damaged due to unseasonal rains)

राज्यात ठाणे, पालघर, रायगड, नाशिक,धुळे,नंदूरबार, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, जालना, परभणी, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 21 जिल्ह्यांमध्ये साधारणपणे 1 मेपासून अवेळी पावसाला सुरवात झाली. सोबत वादळीवारे आणि गारपीटीमुळे या जिल्ह्यातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, जांभूळ, आंबा, भात, चिकू, बाजरी, मका, डाळींब, कांदा, भाजीपाला, पपई, मूग, उडीद, ज्वारी, भुईमूग, संत्रा, धान तसेच फळपिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – Revenue Minister : अरुंद शेत रस्ते होणार 12 फुटांचे, 7/12 वरही रस्त्यांची नोंद होणार, महसूल विभागाचा निर्णय

मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, भातकुली, चांदूरबाजार, चिखलदरा तालुक्यातील तब्बल १० हजार ६३६ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर, रावेर, भडगाव, एरंडोल, मुक्ताईनगर, धरणगाव, बोदवड, पारोळा, अमळनेर तालुक्यातील ४ हजार ३९६ हेक्टर, जालना जिल्ह्यातील अंबड, मंठा, बदनापूर, परतूर,जालना तालुक्यातील १ हजार ६९५ हेक्टर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, बागलाण, त्रंबकेश्वर,सुरगाणा , मालेगाव, दिंडोरी तालुक्यात १ हजार ७३४ हेक्टर, पालघर जिल्ह्यातील पालघर, तलासरी, डहाणू, वाडा, विक्रमगड, वसई तालुक्यातील ७९६ हेक्टर, चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ३८ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी आढावा घेतला आहे. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पीकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाची पथके स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले आहे.



Source link

Comments are closed.