इराण-इस्रायलचे हल्ल्यानंतर होर्मुझमध्ये अडकलेल्या २४ हिंदुस्थानी खलाशांनी मागितली ‘तातडीची मदत’

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘फॉर्वर्ड सीमन्स युनियन ऑफ इंडिया’ने ओमानच्या किनारपट्टीजवळ एका जहाजावर कथित हल्ला झाल्याची माहिती दिली असून या जहाजावर हिंदुस्थानी नागरिकही उपस्थित असल्याचे म्हटले आहे.

‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये या युनियनने व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या एका जहाजावरील २४ भारतीय खलाशांनी तातडीच्या मदतीची मागणी केली आहे, तसेच त्यांनी ओमानच्या किनारपट्टीजवळील आपले अक्षांश-रेखांश देखील शेअर केले आहेत. टाइम्स समूहाच्या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आह.

Comments are closed.