तेलंगणात भीषण अपघातात २४ ठार
प्रवासी बसवर टिप्पर आदळल्याने भयानक दुर्घटना
► वृत्तसंस्था / रंगा रेड्डी
तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिल्ह्यातील महामार्गावर तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या एका प्रवासी बसवर भरधाव वेगाने एक टिप्पर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात 24 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 14 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती देण्यात आली आहे. अनेक प्रवाशांचा मृत्यू जागीच झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या बसमध्ये 70 प्रवासी होते. ती सोमवारी सकाळी विकराबाद बस स्थानकावरुन हैद्राबादला जाण्यासाठी निघाली होती. रंगारे•ाr जिल्ह्यातील महामार्गावर चेवेल्ला येथे समोरुन भरधाव वेगाने येणारा एक टिप्पर या बसवर आदळला. धडकेमुळे बसचा चेंदामेंदा झाला. तर टँकरही उलटून पडला. बसमधील 24 प्रवासी ठार झाले. त्यांच्यापैकी अनेक जागीच गतप्राण झाले तर काही जणांचा मृत्यू उपचार होत असताना झाला. 14 प्रवासी जखमी आहेत. अपघात झाल्यानंतर त्वरित राज्य सरकारच्या आपत्तीनिवारण यंत्रणेने बचाव कार्याला प्रारंभ केला.
पोलिसांकडून माहिती
तेलंगणाचे एडीजी महेश भागवत यांनी या अपघाताची सविस्तर माहिती नंतर पत्रकारांना दिली. बस मार्गाच्या एका बाजूने जात असताना समोरुन येणाऱ्या टिप्परच्या चालकाचा ताबा सुटल्याने तो बसवर समोरासमोर आदळला. हा टिप्पर अतिशय वेगात होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. आपत्तीनिवारण दलांनी त्वरित बचावकार्याला प्रारंभ केल्याने काही जखमी प्रवाशांवर वेळेवर उपचार होऊ शकले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमींवर चेवेल्ला सरकारी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. काही गंभीर जखमी प्रवाशांना अन्य अधिक सोयी असणाऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेया प्रवाशांना प्राथमिक उपचारांच्या नंतर घरी जाऊ देण्यात आले. दुर्घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महामार्गावरील वाहतूक ठप्प
या भीषण अपघातात सापडलेल्या बसचे आणि टिप्परचे तुकडे मार्गावर पसरले होते. अनेक तुकडे बऱ्याच अंतरावर जाऊन पडल्याचे आढळून आले. मृत आणि जखमी प्रवाशांचे अववयही घटनास्थळी तुटून पडले असल्याचे ते दृष्य अत्यंत हृदयद्रावक होते, अशी माहिती पोलिसांना अनेक प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामुळे हैदाबाद-विजापूर मार्गावरील वाहतूक जवळपास सहा तास बंद होती.
मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रे•ाr यांनी या अपघातासंबंधी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातातील जखमींपैकी जास्तीत जास्त जण वाचवेत, यासाठी प्रशासन शक्य ते सर्व प्रयत्न करीत असून आपण रंगारे•ाr जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अनेक सूचना केल्या आहेत. राज्य सरकार बचाव कार्यासाठी आवश्यक सामग्री देत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: बचावकार्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती रे•ाr यांनी दिली. तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्रसमिती पक्षाचे नेते के. चंद्रशेखर राव यांनीही या अपघातामुळे आपल्याला अतिशय दु:ख झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री साहाय्य करणार
तेलंगणाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री बांदी संजय कुमार यांनी या अपघातासंबंधी तीव्र शोक प्रकट केला आहे. केंद्र सरकारकडून शक्य ते सर्व साहाय्य जखमींना अणि मृतांच्या कुटुंबियांना करण्यात येईल. तेलंगणा राज्य सरकारलाही आवश्यक ते साहाय्य केंद्रीय आपत्तीनिवारण विभागाकडून पुरविण्या येईल. केंद्र सरकारचा राज्य सरकारशी संपर्क असून साहाय्य सामग्रुची करतरता पडू दिली जाणार नाही, असे बांदी संजय कुमार यांनी स्पष्ट केले.
			
											
Comments are closed.