24 वर्षीय हर्षवर्धन बिहार क्रिकेटचा नवा बॉस

बिहार क्रिकेट संघटनेच्या (बीसीए) निवडणुकीत 24 वर्षीय हर्षवर्धनची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे बिहार क्रिकेटला तरुण बॉस लाभला असून राज्याच्या सर्वोच्च क्रिकेट संघटनेत तरुणाईची नवी उर्जा संचारली आहे. तसेच प्रिया कुमारी उपाध्यक्ष, जियाउल आरेफिन सचिव, अभिषेक नंदन खजिनदार आणि रोहित कुमार संयुक्त सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.

देशाच्या क्रिकेट वातावरणात मागे पडलेल्या बिहार क्रिकेटला स्फूर्ती देण्याच्या ध्येयाने ही तरुण मंडळी क्रिकेटकारणात पडली आहे. राज्याच्या गावागावात क्रिकेटचा विकास, अत्युच्च सोयीसुविधा उभारणे आणि तरुण आणि महत्त्वाकांक्षी खेळाडूंना अधिकाधिक संधी निर्माण करून देण्याचे ध्येय नव्या कार्यकारिणीने समोर ठेवले आहे. त्यामुळे वरिष्ठ पुरुष आणि 23 वर्षांखालील संघांसाठी निवड चाचणी आणि सराव शिबीर 30 सप्टेंबरपासून पाटणा येथील मोईन-उल-हक स्टेडियमवर सुरू होईल.

Comments are closed.