ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी 280 जादा बस
श्रावणातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची मोठी परंपरा आहे. त्यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने चोख नियोजन केले आहे. सिटीलिंक बससेवा, तसेच राज्य परिवहन महामंडळातर्फे 280 जादा बस उपलब्ध करून दिल्या असून, खंबाळेसह तीन मार्गांवर बाह्य वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी आज दुपारपासूनच भाविक त्र्यंबकेश्वर येथे रवाना होण्यास सुरुवात झाली. फक्त जिह्यातूनच नव्हे तर राज्यातील विविध भागातून भाविक या प्रदक्षिणेसाठी येतात. त्यांची गर्दी लक्षात घेत राज्यमार्ग परिवहन महामंडळाने कालपासूनच अतिरिक्त बस सुविधा सुरू केली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर नियमित सुरू असलेल्या 170 फेऱयांव्यतिरिक्त नाशिकसह खंबाळे, पहिने, आंबोली, घोटी मार्गांवर जादा बस धावत आहेत.
Comments are closed.