छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले

नक्षलवाद मोजतोय अखेरच्या घटका : सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या प्रयत्नांना यश

वृत्तसंस्था/ सुकमा

छत्तीसगडच्या सुकमा जिल्हयात नक्षलवाद उन्मूलन अभियानाच्या अंतर्गत सुरक्षा दलांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. सातत्याने वाढणारा दबाव आणि प्रभावी रणनीतीमुळे 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे. हा घटनाक्रम क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जातेय.

गोगुंडा कॅम्पच्या स्थापनेपासूनच या भागात सुरक्षा दलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे नक्षलवाद्यांच्या हालचालींवर अंकुश लावणे शक्य ठरले होते. सुरक्षा दलांकडून सातत्याने राबविण्यात येणारी शोधमोहीम आणि अन्य दबावच्या रणनीतिंमुळे प्रभावित होत या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देत समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्या सर्व 29 नक्षलवाद्यांनी सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्यासमोर स्वत:ची शस्त्रास्त्रs खाली ठेवली आहेत. पोलीस प्रशासनाकडुन यावेळी त्यांना सरकारच्या पुनर्वसन धोरणाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. या धोरणाच्या अंतर्गत नक्षलवाद्यांना समाजात पुन्हा स्थान मिळवून देणे आणि चांगले जीवन जगण्याची संधी प्रदान केली जाते.

केरळपाल एरिया कमिटी नक्षलमुक्त

या सामूहिक आत्मसमर्पणानंतर केरलपार एरिया कमिटी आता नक्षलमुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे मानणे आहे. सुकमा जिल्ह्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी असून ती क्षेत्रात स्थायी शांतता आणि विकासाचा मार्ग प्रशस्त करणार आहे. नक्षलविरोधी अभियान जारी ठेवत क्षेत्रात विकास आणि सुरक्षा सुनिश्चित करता येईल याकरता सुरक्षा दल प्रतिबद्ध आहेत.

Comments are closed.