लविश सिंग, अर्शियान शेखची तडाखेबंद शतके

29व्या एमसीए अजित नाईक स्मृती 14 वर्षांखालील निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत लविश सिंग (नाबाद 140) आणि अर्शियान शेखची (104) तडाखेबंद शतके तसेच आरव यादवच्या (7 विकेट) अचूक माऱ्याच्या जोरावर एम.व्ही. स्पोर्टस् क्लबने पोलीस जिमखाना संघाविरुद्ध 163 धावांनी विजय मिळवला. आझाद मैदान येथील न्यू एरा मैदानावर झालेल्या सामन्यात सोमवारी एम.व्ही. स्पोर्टस् क्लबने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी करताना 45 षटकांत 3 बाद 289 अशी धावसंख्या उभारली. लविश सिंगची 18 चौकार व एका षटकारासह 140 धावांची नाबाद खेळी महत्त्वपूर्ण ठरली. अर्शियान शेखने (104) त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल पोलीस जिमखाना संघाचा डाव 33.1 षटकांत 126 धावांवर आटोपला. आरव यादवसह (38 धावांत 7 विकेट) अतुल चौधरीने प्रभावी गोलंदाजी करत विजय सुकर केला. लविशला सामनावीर घोषित करण्यात आले.

Comments are closed.