भारताच्या कसोटी इतिहासात 17 वर्षांनी बनला असा रेकाॅर्ड! पंतनेही रचला इतिहास
भारत वि इंग्लंड कसोटी: भारताचा यष्टीरक्षक डावखुरा फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध हेडिंग्ले येथे जोरदार शतक ठोकत पुन्हा एकदा रेकाॅर्ड नोंदवला आहे. आशियाबाहेर एकाच कसोटी डावात तीन भारतीय फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. (Rishabh Pant century vs England)
पंतने शोएब बशीरच्या चेंडूवर एका हाताने षटकार ठोकत आपल्याच ट्रेडमार्क शैलीत नाबाद शतक पूर्ण केलं. याआधी युवा सलामीवीर यशस्वी जायस्वाल आणि कर्णधार शुबमन गिल यांनीही शानदार शतके झळकावली होती. या तिन्ही शतकांनी परदेशात भारतीय कसोटी क्रिकेटसाठी एक दुर्मिळ आणि विशेष कामगिरी झाली. (Indian batters overseas centuries recor)
आशियाबाहेर एकाच कसोटी डावात 3 भारतीय फलंदाजांनी शतक ठोकण्याची ही चौथी वेळ आहे. याआधी 1986 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुनील गावसकर, श्रीकांत आणि मोहिंदर अमरनाथ, 2002 मध्ये हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, 2006 मध्ये ग्रोस आयलेट येथे वेस्ट इंडीजविरुद्ध वीरेंद्र सेहवाग, राहुल द्रविड आणि मोहम्मद कैफ यांनी ही कामगिरी केली होती.
आरसिबीविरुद्ध आयपीएलमध्ये पुन्हा एकदा फॉर्ममध्ये परतल्यानंतर पंतने आता इंग्लंडमध्ये बॅक-टू-बॅक कसोटी शतके झळकावली आहेत. 99.1 षटकांतला तो क्षण पंतच्या धाडसी खेळ कौशल्याची पूर्ण झलक दाखवणारा होता. शोएब बशीरच्या चेंडूवर पुढे सरसावत आणि एक हाताने षटकार मारत त्याने आपले 7वे कसोटी शतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने हेल्मेट काढून सलाम ठोकला, बॅट खाली टाकली आणि त्याचा सिग्नेचर सोमरसल्ट साजरा केला.
ही तिसरी वेळ होती जेव्हा पंतने षटकार मारत कसोटी शतक पूर्ण केले. ही तिन्ही शतके इंग्लंडच्या फिरकीपटूंविरुद्ध आदिल रशीद, जो रूट आणि शोएब बशीर यांच्या विरुद्ध झळकावली. याआधी सचिन तेंडुलकरने 6 वेळा आणि रोहित शर्माने 3 वेळा ही कामगिरी केली आहे. या डावानंतर रिषभ पंत आता भारतासाठी सर्वाधिक 7 कसोटी शतके झळकावणारा यष्टिरक्षक बनला आहे. (Rishabh Pant six to reach century)
Comments are closed.