3 मोफत सिलिंडर, व्याजमुक्त कर्ज

तामिळनाडू भाजपचे घोषणापत्र : महिलांना दर महिन्याला 2000 रुपये

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी स्वत:चे घोषणापत्र जारी केले आहे. यात महिलांसाठी दर महिन्याला 2000 रुपये, वर्षाकाठी 3 एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचे आश्वासन आहे. भाजप नेते जगतप्रकाश न•ा यांच्या हस्ते या घोषणापत्राचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात तामिळनाडू भाजप अध्यक्ष नैनार नागेंद्रन, तमिळसाई सौंदर्यराजन आणि के. अण्णामलाई उपस्थित होते.

द्रमुक, अण्णाद्रमुक आणि टीव्हीके यासारख्या पक्षांच्या घोषणापत्रांप्रमाणेच भाजपने देखील महिलांसाठी मासिक वित्तीय सहाय्य योजना, मोफत गॅस सिलिंडर आणि कर्ज अनुदान यासारख्या आश्वासनांना सामील पेले आहे.  तामिळनाडू हे जगातील सर्वात जुन्या संस्कृतींचे एक केंद्र राहिले असून प्रत्येक भारतीय या सांस्कृतिक गौरवावर गर्व करतो. परंतु द्रमुक सरकारच्या काळात हेच सांस्कृतिक राज्य आता गुन्ह्यांचे केंद्र ठरत असल्याचा आरोप न•ा यांनी केला आहे.

भाजपच्या घोषणापत्रात काय?

-प्रत्येक घराच्या महिला प्रमुखाला 2000 रुपयांचे मासिक वित्तीय सहाय्य देणार, याचबरोबर प्रत्येक परिवाराला एकरकमी 10 हजार रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाणार.

-दरवर्षी तीन मोफत सिलिंडर देण्याचा उपाय करण्यात येणार आहे. पोंगल, तमिळ नववर्ष आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात हे मोफत सिलिंडर वितरित करण्यात येणार.

-महिलाविरोधी गुन्हे रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येणार. या उद्देशाने झिरो एफआयआर नोंदणी प्रणाली सुरू करणार. विशेष जलदगती न्यायालयाद्वारे खटले चालविले जाणार.

-बसेस, शाळा आणि विद्यापीठांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार, जेणेकरून 100 टक्के देखरेख सुनिश्चित केली जाऊ शकेल. सर्वप्रकारचे गुन्हे रोखण्यावर भर देण्यात येणार.

धार्मिक अन् सांस्कृतिक घोषणा

भाजपने स्वत:च्या अजेंड्यांतर्गत थाईपूसमला राज्य उत्सव घोषित करण्याचे आश्वासन दिले आहे. हा उत्सव भगवान मुरुगन यांच्याशी संबंधित आहे. तसेच तिरुपरंकुंद्रम पर्वतावर कार्तिगई दीपम परंपरा पुन्हा सुरू करणे आणि ती सुरक्षित राखण्याचा मुद्दा यात सामील आहे. हा मुद्दा यापूर्वीच द्रमुक आणि भाजप दरम्यान वादाचे कारण ठरला आहे.

पायाभूत अन् रेल्वे प्रकल्पांवर लक्ष

भाजपने तामिळनाडूतील रेल्वेजाळे मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे, यात चेन्नई-बेंगळूर, चेन्नई-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर, कोइम्बतूर-तिरुप्पूर-सलेम आरआरटीएस आणि नव्या वंदे भारत रेल्वेंद्वारे दिल्ली, मुंबई आणि कोलकाता शहराशी जोडण्याच्या योजना सामील आहेत.

 

Comments are closed.