राजस्थानमधील जोधपूरमध्ये 3 दहशतवाद्यांना अटक

जोधपूर :

राजस्थानच्या जोधपूमध्ये एटीएस आणि आयबीने शुक्रवारी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि इंटेलिजेन्स ब्युरोच्या (आयबी) संयुक्त कारवाईत तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंध आणि फंडिंग नेटवर्कच्या संपर्कात असल्याचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे. जोधपूर येथून अयूब तर मसूदला पीपाड येथून अटक करण्यात आली. तर सांचौर येथून उस्मानला ताब्यात घेण्यात आले आहे.

दहशतवादी कारवायांप्रकरणी छापे टाकत एटीएसने 3 दहतशवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यादरम्यान दोन संशयितांना जोधपूर येथे तर एका संशयिताला जैसलमेर येथून पकडण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जोधूपर विभागात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईदरम्यान आक्षेपार्ह सामग्री एटीएसच्या हाती लागली असून यात अनेक महत्त्वाचे दस्तऐवज, मोबाइल, दहशतवादी संघटनांशी निगडित साहित्य आणि आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे सामील आहेत. अटक करण्यात आलेल्या तिन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करत त्यांच्या संपर्कात आणखी कुणी होते का हे पाहिले जाणार आहे.

 

Comments are closed.