तामिळनाडूत ३१ बांगलादेशी घुसखोरांना अटक

वृत्तसंस्था/ चेन्नई

तामिळनाडूच्या तिरुपूर जिह्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) तामिळनाडूतील कोइम्बतूरमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केलेल्या 31 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. हे सर्वजण पल्लादम परिसरात राहत होते. या घुसखोरांबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाची नियुक्ती करून घुसखोरांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड सापडले असून सदर घुसखोर येथील खासगी कंपन्यांमध्ये काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडून पॅन कार्डही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Comments are closed.