कॉंग्रेसमध्ये सामील होण्यास इच्छुक 32 आमदार
पंजाब काँग्रेसच्या दाव्यामुळे हालचाली गतिमान : सत्तारुढ आप सतर्क
वृत्तसंस्था/ अमृतसर
दिल्लीत सत्ता गमाविलेल्या आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम आदमी पक्षाचे 32 आमदार माझ्या संपर्कात आहेत. हे 32 आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत असा दावा काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा यांनी केला आहे.
आप सरकारने कुठलेच काम केलेले नाही आणि याचमुळे हे आमदार नाराज आहेत. आप सरकारने महिलांना दर महिन्याला 1 हजार रुपये देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही असे बाजवा म्हणाले. भगवंत मान सरकार विधानसभा अधिवेशन दीर्घकाळ चालवू इच्छित र्पी. भीतीपोटी आम आदमी पक्ष मुख्यमंत्रीच बदलू पाहत आहे. भगवंत मान यांच्याऐवजी अन्य नेत्याला हे पद सोपविले जाऊ शकते असे बाजवा यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील पक्षाच्या पराभवानंतर आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एक बैठक बोलाविली होती. यात पंजाबमधील पक्षाच्या सर्व आमदारांना बोलाविण्यात आले होते. ही बैठक सामान्य होती, असा आपने दावा केला. परंतु आम आदमी पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चेदरम्यान ही बैठक बोलाविण्यात आली होती. आम आदमी पक्षाला दिल्ली निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. आम आदमी पक्षाची 12 वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणत भाजपने 48 जागांवर विजय मिळविला. तर आम आदमी पक्षाला 22 जागा जिंकता आल्या. काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नाही. परंतु आपच्या दिल्लीतील पराभवामुळे पंजाबमध्ये काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. दिल्लीतील आपच्या पराभवाचा प्रभाव पंजाबमध्येही होईल असे काँग्रेसला वाटत आहे.
Comments are closed.