Photo – 37 वर्षीय महिलेने एकाच वेळी केले दोन ऑस्ट्रेलियन पुरुषांशी लग्न, दोघांनाही दिला 10 लाखांचा हुंडा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

थायलंडमधील एका 37 वर्षीय महिलेने दोन ऑस्ट्रेलियन पुरुषांशी लग्न केले आहे. थायलंडमधील प्राखोन चाय जिल्ह्यात 28 फेब्रुवारीला हा विवाहसोहळा पार पडला.

दुआंगदुआन केटसारो असे त्या नववधूचे नाव आहे. केटसारो ही पाच वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाचा निवृत्त पोलीस अधिकारी रोमान याला भेटली. त्यानंतर काही दिवसांनी ती रोमानचा खास मित्र मॅकी याला भेटली.

केटसारो ही गेल्या पाच वर्षांपासून रोमानला डेट करत आहे तर मॅकी व ती वर्षभरापासून नात्यात आहेत. लग्नामध्ये रोमान आणि मॅकी यांना केटसारोने प्रत्येकी 10 लाख बाथ म्हणजेच अंदाजे 29 लाख रुपयांचा हुंडा दिला आहे.

केटसारो हिच्या पहिल्या लग्नापासून तिला तीन मुलं आहेत. तसेच दोन नातवंड देखील आहेत.

Comments are closed.