38th National Games – महाराष्ट्रच्या खेळाडूंची पदकांची लयलूट, गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घेतली झेप

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यासाठी महाराष्ट्राने आपली पदकांची घोडदौड कायम ठेवली आहे. स्पर्धेेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा अर्धशतकाचा पल्ला पार करीत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत 13 सुवर्णांसह 22 रौप्य आणि 15 कांस्य पदकांची लयलूट केली आहे.

महाराष्ट्राने 38 व्या राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुसर्‍या स्थानावर झेप घेतली आहे. स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याची कामगिरीही महाराष्ट्राने पहिल्या दिवसापासून कायम राखली होती. सुवर्णपदकांची संख्या कमी असल्याने शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र तिसर्‍या स्थानावर होता. 1 फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात खोखोमधील 2 व डायव्हिंगमधील ऋतिका श्रीरामच्या पदकामुळे सर्वाधिक 10 पदके जिंकण्याचा करिश्मा महाराष्ट्र संघाने घडवून अव्वल स्थान गाठले होते.

महाराष्ट्राने जलतरणात 5, सायकलिंग मध्ये 1, ट्रायथलॉनमध्ये 2, नेमबाजीत 2, खो-खोत 2, स्क्वॉशमध्ये 1, अशी 13 सुवर्णपदके पटकावली आहेत. जलतरणात 5 सुवर्णपदकांसह 20 पदकांची कमाई केली आहे. कबड्डी, वुशु, रग्बी, वेटलिफ्टिंग, योगा खेळातही महाराष्ट्राने पदकांची पटकावली आहेत. एक स्पर्धाविक्रमही महाराष्ट्राच्या नावावर आहे. वैष्णव ठाकूर या 23 वर्षीय खेळाडूने 38 वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली आहे.

Comments are closed.