चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध शतक ठोकणारे 4 फलंदाज! 'किंग' कोहलीचाही समावेश

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) नवव्या आवृत्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. स्पर्धा जसजशी पुढे सरकते, तसतसा चाहत्यांचा उत्साहही वाढत चालला आहे. (23 फेब्रुवारी) रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाचवा सामना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये भारताने 6 विकेट्सने पाकिस्तानला धूळ चारली. या विजयात विराट कोहलीने (Virat Kohli) धमाकेदार शतक झळकावले.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात विराट कोहलीचे हे पहिले शतक होते. यासह, विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतके झळकावणाऱ्या 4 फलंदाजाबद्दल जाणून घेऊया.

1) सनथ जयसुरिया (कोलंबो, 2002)- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिले शतक झळकावण्याचा पराक्रम श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने केला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना पाकिस्तानशी झाला, ज्यामध्ये पाकिस्तानी संघ पूर्ण षटके खेळल्यानंतर 200 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात, श्रीलंकेने हे लक्ष्य 36.1 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. दरम्यान जयसूर्या 102 धावा काढून नाबाद राहिला.

2) विल यंग (कराची, 2025)- विल यंग (Will Young) पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत आहे. स्पर्धेतील त्याच्या पहिल्याच सामन्यात, त्याने शानदार फलंदाजी केली आणि 113 चेंडूत 107 धावा केल्या. दरम्यान त्याने 12 चौकारांसह 1 षटकार ठोकला. त्यामुळे न्यूझीलंडने पाकिस्तानला 60 धावांनी धूळ चारली.

3) टॉम लॅथम (कराची, 2025)- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची सुरुवात पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यातील सामन्याने झाली. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावांनी धुव्वा उडवला. न्यूझीलंडच्या 2 फलंदाजांनी शतके केली. विल यंग व्यतिरिक्त टॉम लॅथमचे नाव देखील यामध्ये समाविष्ट आहे. लॅथमने 10 चौकारांसह 3 षटकारांसह 118 धावांची नाबाद खेळी केली.

4) विराट कोहली (दुबई, 2025)- जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सुरू झाली, तेव्हा सर्व भारतीय चाहते विराट कोहलीच्या (Virat Kohli) फॉर्मबद्दल खूप चिंतेत होते, पण त्याने पाकिस्तानविरुद्ध ज्या पद्धतीने शतक झळकावले ते पाहून सर्व चाहते आनंदाने भरले. विराटने 111 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 100 धावा केल्या. कोहलीच्या या विराट खेळीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा 6 गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहलीच्या शतकाने हादरला पाकिस्तान! पाकिस्तान कर्णधार म्हणाला, “जग म्हणत आहे…”
“भारतीय युवा स्टारला पाकिस्तानी दिग्गजाने दिली दाद, काय म्हणाले वसीम अकरम?”
जियो हॉटस्टार वरती ऐतिहासिक क्षण! भारत-पाकिस्तान सामन्याने गाठला 60 कोटी प्रेक्षकांचा नवा उच्चांक

Comments are closed.