मणिपूरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 ठार
कांगपोकपीमध्ये वाहनावर हल्ला
वृत्तसंस्था/इंफाळ
मणिपूरमध्ये गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी कांगपोकपी जिह्यात दहशतवाद्यांनी एका वाहनावर हल्ला केला. अधिक्रायांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात किमान 4 जण ठार झाले. हा हल्ला मकुई अशंग आणि थाबाम्बा नागा यांच्यामधील एका निर्जन भागात झाला. हल्ल्यानंतर एक व्यक्ती बेपत्ता आहे. मृत झालेले चारही जण लियांगमाई नागा समुदायाचे होते. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाल्याने ठिकठिकाणी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
Comments are closed.