अमेरिकेत मॅनहॅटनमध्ये गोळीबार; पोलीस अधिकाऱ्यासह 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

अमेरिकेत मॅनहॅटनमध्ये 28 जुलै (अमेरिकेच्या वेळेनुसार) संध्याकाळी, न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटनमध्ये एकाने बंदुकीने गोळीबार सुरु केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात एका पोलिस अधिकाऱ्यासह 4 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्क पोलिसांनी प्रत्युत्तरात हल्लेखोराला ठार मारले आहे आणि संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आला आहे.

महापौर एरिक अॅडम्स यांनी एक्सला सांगितले की, या गोळीबारामध्ये एका अधिकाऱ्याला जीव गमवावा लागला आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, पार्क अव्हेन्यू आणि ईस्ट 51 व्या स्ट्रीटभोवतीचा परिसर नियंत्रित करण्यात आला आहे आणि एकमेव गोळीबार करणारा मारला गेला आहे.

या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून, सध्या, घटनास्थळावर पोलिसांचे नियंत्रण आहे. फॉक्स न्यूजने न्यू यॉर्क पोलिस विभागाचा हवाला देत वृत्त दिले की, एका पोलिस अधिकाऱ्यासह किमान सहा जणांना गोळ्या लागल्या आहेत आणि अधिकाऱ्याला गंभीर अवस्थेत प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ज्या भागात हल्ला झाला त्या भागात अनेक पंचतारांकित व्यावसायिक हॉटेल्स तसेच कोलगेट पामोलिव्ह आणि ऑडिटर केपीएमजीसह कॉर्पोरेट मुख्यालये आहेत. हल्लेखोर मारला जाण्यापूर्वी, महापौरांनी न्यूयॉर्कवासीयांना सांगितले की “मिडटाउनमध्ये सध्या गोळीबार करणाऱ्याचा शोध सुरू आहे. तुम्ही जवळपास असाल तर कृपया योग्य सुरक्षा खबरदारी घ्या आणि जर तुम्ही पार्क अव्हेन्यू आणि ईस्ट 51 व्या स्ट्रीटजवळ असाल तर बाहेर जाऊ नका.”

Comments are closed.