12 चेंडूत 11 षटकार ठोकत सलमान निजारची धडाकेबाज खेळी, एका षटकातच केल्या 40 धावा!
भारतात कौश्यलाची कमतरता अजिबात नाही. या देशात रोज नवनवीन स्टार्स समोर येत आहेत. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये टी20 लीग खेळल्या जात आहेत, जिथे धावांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशाच केरळ क्रिकेट लीगमध्ये (KCL) सलमान निजारची (Salman Nijar) तुफान फलंदाजी पाहायला मिळाली. सलमानने शेवटच्या 12 चेंडूत तब्बल 11 षटकार ठोकत विक्रम रचला. त्यातच एका षटकात त्याने तब्बल 40 धावा ठोकल्या.
केरळ क्रिकेट लीगमधील अडाणी तिरुअनंतपुरम रॉयल्स विरुद्ध कालीकट ग्लोबस्टार या सामन्यात ही खेळी पाहून प्रेक्षक थक्क झाले. कालीकट ग्लोबस्टारने 18 षटकांत 6 गडी गमावून फक्त 115 धावा केल्या होत्या. त्यावेळी 13 चेंडूत 17 धावा करून खेळणाऱ्या सलमान निजारकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
सलमानने 19व्या षटकात पहिल्या 5 चेंडूंवर सलग षटकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली. त्यानंतर 20व्या षटकात त्याने 6 पैकी 6 चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. त्यातच नो-बॉल आणि वाईड मिळाल्यामुळे या षटकात एकूण 40 धावा जमल्या. म्हणजेच सलमानने शेवटच्या 12 चेंडूत तब्बल 11 षटकार ठोकले.
केवळ 2 षटकांतच 71 धावा झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या संघाने 20 षटकांत 186 धावा केल्या. सलमानने फक्त 26 चेंडूत 86 धावांची तुफानी खेळी खेळली. या खेळीत त्याने 12 गगनचुंबी षटकार ठोकले.
केरळ क्रिकेट लीग 2025 च्या हंगामात सलमानची ही पहिलीच अशी खेळी नाही. याआधीही त्याने 26 चेंडूत नाबाद 48, 34 चेंडूत नाबाद 51 आणि 44 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती.
याच हंगामात सलमानला आयपीएल 2025 च्या मिड-सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने ट्रायलसाठी बोलावले होते. त्यामुळे आता आयपीएल 2026 च्या लिलावात सलमानवर पैशांची बरसात होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.