ब्राझीलमध्ये एका गाईसाठी मोजले 42 कोटी
ब्राझीलमध्ये व्हियाटिना-19 नावाची एक गाय तब्बल 4.8 लाख डॉलर्स म्हणजेच 42 कोटी रुपयांना विकली गेली आहे. ही नेलोर जातीची गाय असून तिचे नाव व्हियाटिना-19 असे आहे. ही गाय आतापर्यंतची सर्वात महागडी गाय ठरली आहे. ब्राझीलमधील मिनास गेराईसमध्ये या गाईने हा इतिहास रचलाय.
या गाईचे वजन तब्बल 1 हजार 101 किलो इतके आहे. जे कोणत्याही सामान्य गाईच्या दुप्पट आहे. ही गाय सौंदर्याच्या बाबतीतही सर्वोत्तम आहे. तिने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये आपले नाव नोंदवले आहे. ‘चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड’ स्पर्धेत ‘मिस साऊथ अमेरिका’ हा किताबही पटकावलेला आहे. या नेलोर जातीच्या गाईला हिंदुस्थानात ओंगोल जातीची गाय म्हणूनही ओळखले जाते. आंध्र प्रदेशातील ओंगोल प्रदेशात जन्मलेल्या या गाई अति उष्णतेचा सामना करण्यासाठी ओळखल्या जातात. या गाईला पाहण्यासाठी विविध ठिकाणाहून लोक येतात.
Comments are closed.