सौदी अरेबियामध्ये बसचा भीषण अपघात, 42 हिंदुस्थानी नागरिकांचा मृत्यू

मदीना जवळ उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस आणि डिझेल टँकर यांच्यात झालेल्या भीषण धडकेत किमान 42 जणांचा मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील स्थानिक माध्यमांच्या मते, मृतांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक असल्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मक्का ते मदिना जात असताना हिंदुस्थानातील वेळेनुसार पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, बसमधील बहुतांश प्रवासी तेलंगणातील हैदराबादचे होते.
तेलंगणा सरकारने सांगितले आहे की त्यांनी रियाधमधील हिंदुस्थानच्या दूतावासाशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांना दूतावासातील अधिकार्यांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत.
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की बसमध्ये आग लागली तेव्हा 42 उमराह यात्रेकरू बसमध्ये होते. ते म्हणाले की ते रियाधमधील हिंदुस्थानी दूतावासाचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन (DCM) अबू मॅथेन जॉर्ज यांच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांनी अपघाताबाबत माहिती गोळा केली जात असल्याचे आश्वासन दिले आहे.
ओवैसी यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे की मृतांच्या पार्थिव देहांना हिंदुस्थानींना परत आणावे आणि जखमींना योग्य वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत.

Comments are closed.