428 पासपोर्ट जप्त, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

विदेश मंत्रालय उत्प्रवासी संरक्षी कार्यालय (पीओई) व नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या मदतीने वाशी, बेलापूर, पनवेल आणि खारघर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 428 पासपोर्टसह ऑफर लेटर, बनावट शिक्के जप्त करण्यात आले.
एमिग्रेशन अॅक्ट 1983 च्या कलम 35 अंतर्गत संयुक्त मोहीम राबविण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करून वैध नोंदणी किंवा परवाना नसतानाही अनधिकृत परदेशी भरती उपक्रमांची झाडाझडती घेण्यात आली. पोलिसांच्या पथकाने प्रवाशांचे 428 पासपोर्ट जप्त केले. त्याचबरोबर रोजगार ऑफर लेटर, लॉगबुक, व्हिसा, बनावट व्हिजिटिंग कार्ड, बनावट रबर शिक्के तसेच बेकायदेशीर परदेशी भरती उपक्रमांमध्ये वापरण्यात आलेली इतर कागदपत्रे जप्त केली. ही कागदपत्रे व साहित्य पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने ताब्यात घेतली आहेत.

Comments are closed.