टीम इंडियाच्या सिलेक्शनवर 5 मोठ्या अपडेट्स, अनेक स्टार खेळाडूंची जागा धोक्यात

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाच्या स्क्वाडची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अजूनही भारतीय संघाचा स्क्वाड जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की शेवटी कोणत्या खेळाडूंना संघात संधी मिळणार? दरम्यान, आशिया कप 2025 संदर्भात टीम इंडियाच्या स्क्वाडबाबत 5 मोठ्या अपडेट्स समोर आल्या आहेत. शुबमन गिलला देखील टी20 संघात सामील करण्याची चर्चा सुरू आहे, मात्र त्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.

खरं तर, आशिया कपनंतर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे, जी डब्ल्यूटीसीच्या दृष्टीने खूप महत्त्वाची ठरणार आहे. अशा परिस्थितीत शुबमन गिलला आशिया कपमधून ड्रॉप केले जाण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरलाही संघात जागा मिळताना दिसत नाही.

Comments are closed.