जर्मनी हादरले! निवासी भागात अंदाधुंद गोळीबार, 5 जणांचा मृत्यू
उत्तर जर्मनीतील स्टेड शहरात सोमवारी एका माथेफिरूने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी मुख्य बंदूकधाऱ्यासह आणखी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेड शहरातील एका ‘युवा कल्याण केंद्रा’जवळ हा गोळीबार झाला. “एका निवासी केंद्रात झालेल्या या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत,” असे पोलीस प्रवक्त्याने वृत्तसंस्थेला सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण शहरात हाय अलर्ट जारी केला असून घटनास्थळी मोठी सुरक्षा मोहीम राबवली जात आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी संबंधित परिसरात जाणे टाळावे आणि पोलिसांना तपासात सहकार्य करावे,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Comments are closed.