पंजाबच्या टार्न तारानमध्ये 5 ड्रग तस्करांना अटक

टार्न तारन:

सीमेवर तैनात बीएसएफने मोठी कारवाई करत अमली पदार्थांच्या 5 तस्करांना जेरबंद केले आहे. या तस्करांकडून 2 पिस्टल, 4 मोबाइल, दोन बाइक, हेरॉइनची 9 पाकिटे (एकूण 5 किलो वजन) हस्तगत करण्यात आली आहेत. बीएसएफने प्राथमिक चौकशी केल्यावर या तस्करांना पंजाब पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सीमेवर सातत्याने दक्षता वाढवत बीएसएफच्या पथकांनी सुरसिंह क्षेत्रात गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने एका चारचाकी वाहनातून प्रवास करत असलेल्या 5 तस्करांना ताब्यात घेतले. या वाहनाची झडती घेतली असता अमली पदार्थ हस्तगत झाले. बीएसएफच्या पथकाने राणियां गावातून एक ड्रोन, पिस्तुल आणि त्याच्या गोळ्या ताब्यात घेतल्या आहेत. तर अटक करण्यात आलेले तस्कर हे तरनतारन जिल्ह्यातील मालूवाल, सोहल, गोइंदवाल साहिब या गावांशी संबंधित असल्याचे समजते.

Comments are closed.