श्रीलंकेच्या नेव्हीने अटक केलेले 5 भारतीय मच्छिमार

रामेश्वरम:

श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी पहाटे रामेश्वरम येथील 5 तमिळ मच्छिमारांना कच्छतिवू (नेदुंथीवु) बेटानजीकच्या सागरी भागात अटक केली आहे. या मच्छिमारांवर आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषा (आयएमबीएल) पार करत श्रीलंकन जलहद्दीत अवैध स्वरुपात मासेमारी केल्याचा आरोप आहे. संबंधित मच्छिमार सोमवारी रात्री एका नौकेतून समुद्रात उतरले होते आणि कच्छतिवूनजीक मासेमारी करत होते. तेव्हाच श्रीलंकन नौदलाच्या गस्त पथकाने त्यांना घेरुन अटक केली आहे. तसेच श्रीलंकेच्या नौदलाने या मच्छिमारांच्या नौका जप्त केल्याची माहिती स्थानिक मच्छिमार संघाने दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या मच्छिमारांना श्रीलंकेच्या कंकेसनथुरई किंवा तलाईमन्नार येथे नेण्यात आल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.