गडचिरोली-चामोर्शी मार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, १२ जखमी
गडचिरोली-चामोर्शी मार्गावर आज सायंकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी वाहनात एकूण १६ प्रवासी प्रवास करत होते. ही गाडी रामपूर येथून दुपारी ३ वाजताच्या दरम्यान लग्न सोहळा आटोपून भाडभीडी मोकासा येथे जात होती. दरम्यान, गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या प्रवासी ट्रॅव्हल्सशी या खासगी वाहनाला टार्निंगवर जोरदार धडक झाली. धडकेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच यात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Comments are closed.