वैभव सूर्यवंशी ते फिन ॲलन! 2025 मध्ये बनलेले 'हे' 5 जागतिक विक्रम मोडणे जवळपास अशक्य

2025 या वर्षात क्रिकेट जगतात काही असे मोठे विक्रम प्रस्थापित झाले आहेत, ज्यांची चर्चा सर्वत्र होत आहे. यावर्षी अनेक अशा खेळाडूंनी जागतिक विक्रम आपल्या नावावर केले, ज्यांची नावे याआधी फार कमी लोकांनी ऐकली होती. विशेषत तरुण खेळाडूंचे या वर्षात वर्चस्व पाहायला मिळाले.

वैभव सूर्यवंशी: भारताचा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi & Finn Allen) आणि न्यूझीलंडचा फिन ॲलन यांनी रचलेले विक्रम मोडणे अत्यंत कठीण मानले जात आहे.

14 वर्षे 272 दिवस या वयात नागालँडविरुद्ध शतक झळकावून तो ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

फिन ॲलन (न्यूझीलंड): त्याने ‘मेजर लीग क्रिकेट’मध्ये वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध खेळताना एकाच डावात तब्बल 19 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम केला.

शाई होप (वेस्ट इंडिज): त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता 13 वेगवेगळ्या देशांविरुद्ध शतके झळकावली आहेत. असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे.

सोनम येशे (भूतान): या महिला खेळाडूने एकाच टी-20 डावात 8 विकेट्स घेण्याचा आश्चर्यकारक विक्रम केला.

गेडे प्रियांदना (इंडोनेशिया): या गोलंदाजाने चक्क एकाच षटकात 5 विकेट्स मिळवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

Comments are closed.