5 सुरक्षा यंत्रणा भारत सुरक्षित ठेवतात

केवळ एस-400 नव्हे : विशाल भूभागाचे केले हल्ल्यांपासून रक्षण

पाकिस्तानने मंगळवारी रात्री जम्मू, उधमपूर, सांबा, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोटवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. परंतु ही क्षेपणास्त्रs आकाशातच नष्ट करण्यात आली. भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी या ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांना उद्ध्वस्त केले आहे. भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थान तसेच गुजरातवरील हल्ले हाणून पाडले आहेत. सैन्याच्या एअर डिफेन्स युनिटने ड्रोन हल्ले रोखण्यासाठी एल-70 गन, झेडयू-23 एमएम सिस्टीम, शिल्का सिस्टीम, काउंटर-युएएस उपकरण आणि एस-400 सुदर्शन चक्र यासारख्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. भारतीय सैन्य देशाचे सार्वभौमत्व आणि क्षेत्रीय अखंडत्वाच्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहे. सर्व आगळीकींना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे सैन्याने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे.

15 शहरांमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानच्या सैन्याने 8 आणि 9 मे दरम्यान पश्चिम सीमेवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. पाकिस्तानने या क्षेपणास्त्रांद्वारे भारताच्या 15 शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवरही अनेकदा युद्धविरामाचे उल्लंघन झाले. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ड्रोन हल्ले रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. सैन्याने पाकिस्तानचे ड्रोन अन् क्षेपणास्त्रs हल्ले अपयशी ठरविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर केला आहे.

एल -70 बंदूक: 40 एमएमची अँटी-एअरक्राफ्ट गनची निर्मिती स्वीडनची कंपनी बोफोर्सने केली होती. ही गन वेगाने हल्ला करू पाहणाऱ्या हवाई लक्ष्यांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. भारताने या गन्सना आधुनिक तंत्रज्ञानाने आणखी प्रभावी स्वरुप दिले आहे.

झेडयू-23 एमएम सिस्टीम : सोव्हियत महासंघाच्या काळातील ही अँटी-एअरग्राफ्ट गन दोन बॅरलयुक्त आहे. याचा वापर करणे सोपे आहे. ही सिस्टीम कमी उंचीवर उडणाऱ्या लक्ष्यांना लक्ष्य करण्यास उपयुक्त आहे. या गन्सना रडार आणि ऑप्टिकल टार्गेटिंग सिस्टीमशी देखील जोडले जाऊ शकते.

शिल्का सिस्टीम : ही एक रडार-निर्देशित ऑटोमॅटिक अँटी-एअरक्राफ्ट वेपन सिस्टीम आहे. यात 23 एमएमच्या 4 ऑटो कॅनन आणि एक  रडार सिस्टीम लावलेली असते. ही सिस्टीम एकाचवेळी अनेक हवाई लक्ष्यांना ट्रॅक आणि नष्ट करू शकते. भारतीय सैन्याने शिल्का सिस्टीमला आधुनिक तंत्रज्ञानाने मॉडिफाय केले आहे.

काउंटर-युएएस सिस्टीम : ड्रोन आणि अन्य मानवरहित यानांचा धोका पाहता भारताने काउंटर-युएएस सिस्टीम देखील तैनात केली आहे. या सिस्टीममध्ये रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल सेंसर लावलेले असतात, जे ड्रोनचा शोध लावतात. या सिस्टीममध्ये जॅमर आणि डायरेक्टेड-एनर्जी वेपन देखील असते, जे ड्रोनना निष्क्रीय करते.

एस-400 सुदर्शन चक्र : एस-400 रशियाकडुन खरेदी करण्यात आलेली हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. याला भारतात ‘सुदर्शन चक्र’ नाव देण्यात आले आहे. एस-400 सिस्टीम 400 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर हवाई लक्ष्यांवर निशाणा साधू शकते. ही यंत्रणा 600 किलोमीटर अंतरावरूनच धोका ओळखू शकते. एस-400 ची निर्मिती रशियन कंपनी अल्माज-एंटेने केली आहे. ही जगातील सर्वात आधुनिक दीर्घ पल्ल्याच्या सरफेस-टू-एअर मिसाइल सिस्टीमपैकी एक आहे. भारताने 2018 मध्ये रशियानसोबत 5.43 अब्ज डॉलर्सचा याकरता करार केला होता.

Comments are closed.