ICCच्या सर्वोत्कृष्ट टीममध्ये भारताचे 5 खेळाडू , पाकिस्तानच्या पदरात निराशा!
आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये 12 वा खेळाडू सुद्धा सामील आहे. तसेच पाकिस्तान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाच्या एकाही दिग्गज खेळाडूंना सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान मिळालेले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन संघामध्ये भारतीय संघाचे 5 खेळाडू सामील आहेत. तसेच न्यूझीलंडच्या 4 खेळाडूंना स्थान मिळालेले आहे. याचबरोबर अफगाणिस्तानचे 2 खेळाडू चॅम्पियन ट्रॉफीच्या सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन मध्ये स्थान देण्यात आलेले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सर्वश्रेष्ठ संघात भारतीय खेळाडूंमधील विराट कोहली श्रेयस अय्यर केएल राहुल मोहम्मद शमी आणि वरून चक्रवर्ती हे सामील आहेत. तसेच बाराव्या खेळाडूच्या जागी भारतीय खेळाडू अक्षर पटेलला स्थान देण्यात आले आहे विराट कोहलीने संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 218 धावा केले आहेत तसेच श्रेयश अय्यरणे 243 धावा केल्या आहेत श्रेयस चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतासाठी सर्वोत्कृष्ट धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि गोल्डन बॅट पुरस्कार जिंकणाऱ्या रचिन रविंद्रला सलामीवीर खेळाडूची जागा मिळाली आहे. त्याने स्पर्धेत 263 धावा आणि तीन विकेट्स घेतले आहेत याशिवाय मैट हेनरीलाही स्थान देण्यात आले आहे. ज्याला गोल्डन चेंडू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हेनरीने स्पर्धेमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ग्लेन फिलिप्स आणि मिचेल सेंटनर यांनाही स्थान दिले आहे. तसेच सेंटनरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन: रचिन रवींद्र, इब्राहिम जादरान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, अजमतुल्लाह उमरजई, मिचेल सैंटनर (कर्णधार), मोहम्मद शमी, मैट हेनरी, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल (12 वा खेळाडू)
हेही वाचा
पांढरा ब्लेझर फक्त चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्यांसाठीच! यामागचं गुपित काय?
अनुष्का शर्माकडुन भारतीय खेळाडूंचं खास अभिनंदन, कर्णधार रोहितसह, हार्दिक पांड्याला दिल्या शुभेच्छा
मोठी बातमी: चॅम्पियन्स ट्रॉफीची खुली बस परेड रद्द, खेळाडू स्वतंत्रपणे घरी जाणार!
Comments are closed.