50 नमो भारत गाड्या बांधल्या जातील

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती : 20 डबे असलेल्या 100 ईएमयूसाठी तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हरियाणाच्या मानेसरमध्ये देशातील सर्वात मोठ्या गतिशक्ती मॉडेल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी केले. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषण केल्या. प्रवासी रेल्वेंना अपग्रेड करण्यासाठी 16 आणि 20 डबे असलेल्या 100 मेनलाइन ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) रेल्वे सुरू केल्या जाणार असून यामुळे कमी अंतराचा प्रवास सुलभ होणार आहे. याकरता काजीपेटमध्ये एक नवा प्रकल्प उभारण्यात आला असून तेथे या रेल्वेंची निर्मिती होणार आहे. तसेच 50 नवो भारत रेल्वे देखील तयार केल्या जाणार आहेत देशभरात 1300 अमृतस्थानकांची निनिर्मती होत असून यातील 100 स्थानके डिसेंबर 2025 पर्यंत तर पुढील वर्षापर्यंत आणखी 500 स्थानके पूर्ण होणार असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे तिकीट आरक्षणातील सुधाराची माहिती दिली आहे. तत्काळ तिकिटांना बोट्सद्वारे ब्लॉक करण्याच्या तक्रारी दूर करण्यात येतील. याकरता 1 जुलैपासून केवळ केवायसी पूर्ण करणाऱ्यांनाच तत्काळ तिकीट आरक्षित करण्याची अनुमती असेल. तिकीट काउंटरवरही ओळखपत्र दाखविणाऱ्यांनाच तिकीट देण्यात येईल. याचबरोबर बिकानेर विभागात नवा प्रयोग सुरू करण्यात आले असून तेथे प्रथम 4 तासांपूर्वी दाखविला जाणारा रिझर्व्हेशन चार्ट आता 24 तासांपूर्वी दाखविला जातोय. यावरून प्रवाशांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

मोनाश विद्यापीठासोबत भागीदारी

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) मेट्रो रेल तंत्रज्ञानात संशोधन आणि विकासावर सहकार्यासाठी मेलबर्न येथील मोनाश विद्यापीठासोबत करारावर मंगळवारी स्वाक्षरी केली. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी मेट्रो भवनात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावर स्वाक्षरी केली. ऑस्ट्रेलियन विद्यापीठाचे प्रतिनिधित्व तेथील रेल्वे तंत्रज्ञान संस्थेकडून करण्यात आले. ही संस्था रेल्वे इंजिनियरिंग आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील कार्यासाठी ओळखली जाते. या कराराच्या अंतर्गत दोन्ही संस्था रोलिंग स्टॉक आणि रेल्वेमार्ग देखभालीचे प्रगत संचालन यासारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त स्वरुपात अध्ययन करणार आहेत. डीएमआरसी अकॅडमी मोनाश विद्यापीठासोबत आदान-प्रदान कार्यक्रमांच्या समवेत सहकार्यात्मक कार्यासाठी ज्ञान आणि प्रशिक्षण भागीदार म्हणून कार्य करणार आहे.

Comments are closed.