मुंबईत 52 हजार रुपयांचे चीज लंपास, पोलिसांत गुन्हा दाखल
![cheese](https://marathi.tezzbuzz.com/wp-content/uploads/2025/02/cheese-696x447.jpg)
मुंबईत 52 हजार रुपयांचे चीज आणि दुधावर डल्ला मारण्यात आला आहे. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल झाला आहे
इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. लोवर परळच्या डिलाईल रोड भागात एका दुध विक्रेत्याला एका अनोळखी माणसाचा फोन आला. या माणसाने विक्रेत्याला 48 लिटर अमूल दूध आणि 84 किलो अमूल क्रीमची ऑर्डर दिली. केईम रुग्णालयाच्या ग्लोबल डेअरीत ही ऑर्डर पोहोचावी असे या माणसाने सांगितले. या संर्पूण चीज आणि अमूल क्रीमची किंमत 52 हजार 764 रुपये झाली. थोड्या वेळात ऑर्डर कन्फर्म करतो असे या माणसाने सांगितले आणि फोन ठेवला.
या माणसाने दुसऱ्या दिवशी दुध विक्रेत्याला फोन केला आणि ही ऑर्डर कन्फर्म केली. सकाळी अकरा वाजता ही ऑर्डर पोहोचवावी असे या माणसाने सांगितले, तसेच ऑर्डर आल्यावर पैसे देऊ असेही या माणसाने सांगितले. माझी माणसं ऑर्डर पोहोचवतील आणि त्यांच्याकडे पैसे द्यायला दूध विक्रेत्याने सांगितले.
दुध विक्रेत्याचे लोक केईएम रुग्णालयाजवळ पोहोचले पण त्यांना ग्लोबल डेअरी सापडलीच नाही. तेव्हा या माणसाने आयटीसी हॉटेलजवळ यायला सांगितलं. त्यानंतर या माणसाने विक्रेत्याच्या कर्मचाऱ्यांना ग्लोबल हॉस्पिटल जवळ यायला सांगितलं. तिथून या माणसाने सर्व ऑर्डर घेतल्या पण पैसे दुकानात जाऊन देतो असे सांगितले. पण आपण दुकानाची चावी विसरलो आणि थोड्याच वेळात येतो असे सांगितले आणि तिथून निघून गेला. बराच वेळ झाला तो माणूस आला नाही. तेव्या या कर्मचाऱ्यांनी त्याला फोन केला तर फोन स्विच ऑफ होता. जिथे चीज आणि क्रीम ठेवली होती तिथे हे कर्मचारी गेले तेव्हा तो मालही जागेवर नव्हता. कर्मचाऱ्यांनी दूध विक्रेत्याला सगळं सांगितलं तेव्हा दूध विक्रेता तिथे दाखल झाला. त्याने आजूबाजूला चौकशी केली, पण त्याला काही माहिती मिळाली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दूध विक्रेत्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
Comments are closed.