राज्यात बालविवाहाच्या प्रमाणात 566 टक्क्यांनी वाढ; सर्वाधिक विवाह बीड जिल्ह्यात

राज्यात बालविवाहाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्या आहेत. सहा वर्षांच्या तुलनेत राज्यात बालविवाहाचे प्रमाण 566 टक्क्यांनी वाढले आहे. 2018-19 या वर्षात राज्यात 187 बालविवाह झाले होते. त्यात वाढ होऊन 2024-25 या वर्षात 1246 एवढे बालविवाह झाले आहेत. महिला व बालकल्याण विभागाने एका माहितीच्या अधिकारात ही माहिती दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतीत वृत्त दिले आहे. 2018-19 साली कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजेच 37 बालविवाह झाले होते. तर नागपुरात एकही बालविवाह झाला नव्हता. त्या वर्षी बीड जिल्ह्यात 36 बालविवाह झाले होते. 2020-21 या वर्षात नागपुरात 11 बालविवाह झाले होते. तर आता 2024-25 या वर्षात नागपुरात 13 बालविवाहाच्या घटना समोर आल्या आहेत.
गेल्या काही वर्षात सोलापूर आणि बीडमध्ये सर्वाधिक बालविवाह झाले आहेत. 2020-21 मध्ये सोलापुरात 68 तर बीमडमध्ये 70 बालविवाह झाले आहेत. परभणीत 2022-23 आणि 2023-24 या वर्षात 113 आणि 159 बालविवाह झाले आहेत. यंदाच्या वर्षात बीडमध्ये सर्वाधिक 187 बालविवाह झाले आहेत.
बहुतांश विवाह हे मार्च ते जून या काळात होता. कारण या महिन्यात मुलांना शाळेची उन्हाळ्याची सुट्टी असते. तसेच अक्षय तृतीयेचा महुर्त साधून अनेकजण या दिवशी विवाह लावतात.
Comments are closed.