58 पाकिस्तान समर्थकांनी आसाममध्ये अटक केली

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या एकूण 58 जणांना आतापर्यंत आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. नव्या घटनेत सोनितपूर जिल्ह्dयात दोन जणांना अटक करण्यात आली असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांनी सांगितले आहे. 58 पाकिस्तानी समर्थक गजाआड आहेत, या आरोपींना देशविरोधी कारवायांसाठी विशेष देखभालही मिळणार असल्याचे उपरोधिक वक्तव्य त्यांनी केले आहे. देशद्रोह्यांच्या विरोधता राज्यव्यापी कारवाई जारी राहणार आहे आणि कुणालाही मोकळं सोडलं जाणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाक समर्थनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या काही आरोपींच्या विरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदविले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी आसाममधील एआययुडीएफ आमदार अमीनुल इसाम यांना पाकिस्तानचे समर्थन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Comments are closed.