रवींद्र जडेजा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी कसोटीत इतिहास रचू शकतो, ही कामगिरी करणारा तो ५वा भारतीय ठरणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शनिवारपासून (२२ नोव्हेंबर) गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. कोलकाता कसोटीतील 30 धावांनी पराभवामुळे टीम इंडियावर पुनरागमनाचे दडपण वाढले आहे. अवघ्या तीन दिवसांत सामना गमावल्यानंतर गुवाहाटी कसोटी आता टीम इंडियासाठी फायनलसारखी झाली आहे.
या महत्त्वाच्या कसोटीत भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा एक नव्हे तर दोन ऐतिहासिक टप्पे गाठण्याच्या अगदी जवळ आहे. अलीकडच्या काळात जडेजाची कसोटीतील कामगिरी उत्कृष्ट राहिली असून आता त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.
Comments are closed.