मिशेल स्टार्कच्या निशाण्यावर रंगना हेराथचा मोठा विक्रम, 6 विकेट्स घेऊन कसोटीचा नंबर-1 डावखुरा गोलंदाज बनणार
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सध्या सुरू असलेल्या ऍशेस 2025-26 कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 4 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा डावखुरा गोलंदाज बनण्यापासून स्टार्क फक्त सहा विकेट्स दूर आहे.
सध्या हा विक्रम श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज रंगना हेराथच्या नावावर आहे, ज्याने 93 कसोटी सामन्यात 433 विकेट घेतल्या आहेत. मिचेल स्टार्कने आतापर्यंत 104 कसोटी सामन्यात 428 विकेट घेतल्या आहेत. शेवटच्या कसोटीत त्याने सहा विकेट घेतल्यास तो हेराथला मागे टाकून कसोटी इतिहासातील नंबर-1 डावखुरा गोलंदाज बनेल.
Comments are closed.