खूप झाला आराम…रोहित, जडेजासह हे खेळाडू रणजी ट्रॉफी खेळणार; कोहली अजूनही विश्रांतीवर
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघातील अनेक स्टार खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या नवीन आदेशानंतर हे घडत आहे. बीसीसीआयनं सर्व क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं बंधनकारक केलंय. मात्र जर एखादा खेळाडू जखमी झाला किंवा प्रशिक्षक आणि व्यवस्थापन त्याला खेळू देऊ इच्छित नसेल तर त्याला सूट दिली जाईल.
आता रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर सारखे खेळाडू 23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणारे विराट कोहली आणि केएल राहुल रणजी ट्रॉफी खेळणार नाहीत. कोहलीनं मानेच्या दुखण्यामुळे पहिल्या सामन्यातून विश्रांती घेतली आहे. तर केएल राहुल ऑस्ट्रेलियाच्या दीर्घ दौऱ्यावर होता. तो 30 जानेवारीपासून बंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर खेळाडूंना दोन आठवड्यांपेक्षा जास्त विश्रांती मिळाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंपैकी 6 खेळाडू 23 जानेवारीपासून रणजी सामने खेळतील. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार शुबमन गिल, सलामीवीर यशस्वी जयस्वाल, यष्टीरक्षक रिषभ पंत, फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव तंदुरुस्त नाहीत, तर विराट कोहली आणि केएल राहुल बाहेर आहेत. याशिवाय, 5 खेळाडू इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळतील. यामध्ये मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांचा समावेश आहे.
हेही वाचा –
धक्कादायक! भारतीय क्रिकेटमध्ये हे काय चाललंय? उपकर्णधारावरून बैठकीत गोंधळ
करुण नायरची संघात निवड न झाल्याने माजी खेळाडूचा संताप, बीसीसीआयला सुनावले!
हर्टब्रेक! अंतिम सामन्यात करुण नायरच्या संघाचा पराभव, पहिलं विजेतेपद हुकलं
Comments are closed.