पाकिस्तानी लष्करी कम्पाउंडमध्ये आत्मघातकी हल्ला; स्फोटकांच्या गाड्यांचा घडवला अपघात, 6 जणांचा मृत्यू
पाकिस्तानच्या लष्करी कम्पाउंडमध्ये स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्या आदळवत दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्यांचा आत्मघातकी दहशतवाद्यांनी अपघात घडवला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला. या हल्ल्यात 6 जणांचा मृत्यू झाला असून त्यात तीन मुलांचा समावेश आहे.
आत्मघातकी हल्लेखोरांनी बन्नू छावणीच्या प्रवेशद्वारावर स्फोटकांनी भरलेल्या दोन गाड्या धडकवल्या. त्यामुळे मोठे स्फोट झाले. त्यानंतर अनेक दहशतवाद्यांनी कंपाऊंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांनी त्यांना रोखत त्यांच्यावर गोळीबार केला. त्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू हा जिल्हा अफगाणिस्तानच्या सामेजवळ आहे. तिथे ही घटना घडली आहे. चकमक सुरू असून सुरक्षा दल हल्लेखोरांचा शोध घेत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
Comments are closed.